। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील उसर्ली येथील नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कळंबोली येथे राहणारे सुमित कदम (32) त्यांचा मित्र अक्षय देसाई (28) व अजून दोन मित्र असे चौघेजण उसर्ली येथील नदीत पोहण्यासाठी गेले असता, या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेजण नदीत बुडाले व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







