एच. पी. ॲडेशीव्ह कंपनीचा स्तुत्य उपक्रम
। वावोशी । प्रतिनिधी ।
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नारंगी येथील एच. पी. ॲडेशीव्ह कंपनीच्या वतीने रा. जि. प. शाळा नारंगी येथील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या पहिला क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच दत्तवाडी नारंगी व लहानवाडी येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला एच. पी. ॲडेशीव्ह कंपनीच्या चेअरमन अंजना हरेश मोटवाणी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच नारंगी गावच्या सरपंच भारती आरावकर, उपसरपंच देवेंद्र देशमुख, सदस्य लिली देशमुख, मीना देशमुख, निनाद गायकवाड, कुंदा जाधव, गुलाब दत्तात्रय वाघुले तसेच ग्रामविकास अधिकारी मनाली म्हसे, नारंगी शाळेचे शिक्षक दीपक खाडे, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढून त्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.







