| चिरनेर | प्रतिनिधी |
भारताच्या स्वातंत्र्यदिनी चिरनेर ग्रामपंचायतीच्यावतीने नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. येथील अत्यावश्यक रुग्णांना तात्काळ सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी चिरनेर ग्रामपंचायतीने हे उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते शंकर नारंगीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच भास्कर मोकल, राजिपचे माजी सदस्य संतोष ठाकूर, माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, शेकापचे उरण तालुका चिटणीस सुरेश पाटील, उपसरपंच अरुण पाटील, माजी उपसरपंच सचिन घबाडी, पोलीस पाटील संजय पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, अरुण ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल खारपाटील, समाधान ठाकूर, समीर डुंगीकर, मृणाली ठाकूर, समुद्रा म्हात्रे, भारती ठाकूर, दीपक कातकरी, यशोदा कातकरी, नीलम चौलकर, निकिता नारंगीकर, वनिता गोंधळी, जयश्री चिर्लेकर आदींसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.







