| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग-रायगड यांच्या विद्यमाने तालुकास्तरीय शालेय योगासना क्रीडा स्पर्धा नेहुली येथील क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेत वेश्वी येथील पीएनपी होली चाईल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
या स्पर्धेत मुलांच्या 14 वर्ष वयोगटात तनिष्क रामनाथकर याने प्रथम तर स्वयंम पुजारी याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुलींच्या वयोगटात अनन्या पाटील हिने प्रथम तर यज्ञ म्हात्रे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. मुलांच्या 17 वर्ष वयोगटात हर्ष कडवे याने द्वितीय तर साई थळे याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. मुलींच्या वयोगटात मनस्वी मळेकर हिने प्रथम तर लावण्या कानगुटकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुलांच्या 19 वर्ष वयोगटात ओम बालके प्रथम, श्लोक रामनाथकर द्वितीय, सानिध्य म्हात्रे तृतीय, करण भगत चतुर्थ तर संजीव पाटील याने पंचम क्रमांक पटकावला आहे. तर, मुलींच्या वयोगटात लावण्या पाटील प्रथम, मनस्वी सावंत द्वितीय, आर्या पेडणेकर तृतीय, मदिहा मुकादम चतुर्थ तर रिंजल चितळे हिने पंचम क्रमांक पटकावला आहे. तसेच, विजेत्यांची जिल्हास्तरीय योगासना क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, होली चाईल्ड एसएससी बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, उपमुख्याध्यापिका शर्मिला शेटे, क्रीडा मार्गदर्शक अक्षय डाकी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.









