। पनवेल । प्रतिनिधी ।
रेल्वेच्या धडकेने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील सेक्टर 6 करंजाडे रेल्वे पटरीच्या मध्ये घडली आहे. रामपाल सिंग (50) या व्यक्तीचा सेक्टर सेक्टर 6 करंजाडे रेल्वे पटरीच्या मध्ये पनवेल ते उरण अश्या जाणाऱ्या रेल्वे पटरीवर अपघात घडून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







