। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील भाताण येथून एक 18 वर्षीय तरुणी गोळ्या आणण्यासाठी मेडिकलमध्ये जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे ती बेपत्ता झाल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
वैष्णवी देउळगावकर असे या तरुणीचे नाव आहे. तिचे वय 18 वर्षे, उंची 5 फुट 3 इंच, रंग गोरा, डोक्याचे केस लांब काळे, नाक सरळ, अंगाने मध्यम, डोळे-काळे आहे. तसेच तिने अंगात निळ्या रंगाचा कुर्ता, निळ्या रंगाची लेगीज, आकाशी रंगाची ओढणी सोबत राखाडी रंगची पर्स आहे. या तरुणीबाबत कोणाला काही माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार भिमाशंकर होलगरी यांच्याशी संपर्क साधावा.







