। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील हुमगाव येथे एक भीषण अपघात झाला. स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. यात ट्रॅक्टरचालकाचा जागीच मृत्यू झाला. संकेत बार्शी असे अपघातातील मृताचे नाव आहे.
हुमगाव येथील किशोर बागडे यांचा हा ट्रॅक्टर असून संकेत बार्शी हा चालक होता. या ट्रॅक्टरमधून ग्रिट वाहून नेली जात होती. दरम्यान पेज नदीच्या पुलावर ट्रॅक्टर आले असता संकेत याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी संकेत ट्रॅक्टरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.






