| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील जांभूळपाडा आणि वेश्वी कातकरी वाडीवरील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. हे दाखले तयार करण्यासाठी उरण सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते नामदेव ठाकूर, मनीष कातकरी व दत्ता गोंधळी यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. महसूल विभागातर्फे तलाठी कोळी, मंडळ अधिकारी मोहिते, तहसीलदार डॉ. उद्धव कदम तसेच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण यांचे देखील सहकार्य लाभले. हे जातीचे दाखले मिळाल्याने आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किशन जावळे, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप विभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक यांच्या सहकार्याने तहसीलदार उरण डॉ. उद्धव कदम, मंडळ अधिकारी के.डी. मोहिते, तलाठी जयहिंद कोळी, सत्यवान पाटील यांच्या संमतीने जातीचे दाखले तयार करण्यात आले.






