| चिपळूण | प्रतिनिधी |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र व रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी प्रशालेने घवघवीत यश प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये 14 वर्षे मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. या संघाची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली.
या संघामधील अवनी शिंदे, अनन्या कदम, अनन्या जाधव, परी जाधव, श्रीया नरळकर या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून नामवंत संघाना पराभूत करून विजयश्री खेचून आणली. त्याचबरोबर 19 वर्षे वयोगट मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. या संघामध्ये अनुष्का कदम, शर्वरी पवार, वेदिका बामणे, रिया पवार व आदिश्री पवार या खेळाडूंचा समावेश होता. सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक, विज्ञान शिक्षक व समुपदेशक प्रदीपकुमार यादव यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाबरोबर व्यवस्थापिका म्हणून सौ. ताम्हणकर यांनी काम पाहिले. या सर्व खेळाडूंचे परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका पाटील आणि सर्व शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले. आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.







