। रायगड । प्रतिनिधी ।
अलिबाग- रोहा मार्गावरील आरसीएफ कॉलनी गेटसमोर कारचा अपघात झाल्याची घटना बुधवारी (दि. 1) घडली आहे. या घटनेत कारचे प्रचंड नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना घडल्यावर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक पोलिसांनी दहा मिनीटात वाहतूक सुरळीत करीत रस्ता वाहतूकीसाठी खुला केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास रेवदंड्याकडून अलिबागकडे बस कुरुळ येथील पुलाजवळून जात होती. त्याचवेळी कार आणि बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये कार आणि बसचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांसह वाहतूक पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला अपघात झालेली वाहने बाजूला काढून दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.







