| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सक्रीय झालेल्या श्रमजीवी जनता सहायक मंडळ आणि आदिवासींच्या आर्थिक उत्कर्षासाठी सावित्री आदिवासी सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त कार्यक्रमप्रसंगी महसूल व वन विभागाच्या सेवा पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तहसिलदार घोरपडे यांनी यापूर्वीच्या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी आदिवासी समाजाचे जातीचे दाखले, रेशनकार्ड यांचे वाटप करण्यात आले होते. त्याचप्रकारचे दाखले व रेशनकार्ड वाटप सेवा पंधरवडानिमित्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पुरवठा अधिकारी आबा जगताप यांनी सेवा पंधरवड्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी महाड उपविभागीय अधिकारी ओमासे, पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे, पुरवठा अधिकारी आबा जगताप, मंडळअधिकारी मंगेश पवार व फुलचंद राठोड, श्रमजीवीचे राम कोळेकर, विठ्ठल कोळेकर, संस्था सचिव अशोक पागे, लेखा परिक्षक राजाराम पाटील, महाड फिल्ड ऑफिसच्या मेधा कदम, विजया पाटेकर, खडपीचे माजी सरपंच दीपक साबळे, आदिवासी कातकरी विकास मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग वाघे, माजी अध्यक्ष काशिनाथ पवार, चंद्रकांत निकम, सचिव संजय वाघमारे, उपाध्यक्ष शंकर पवार आणि खजिनदार विनायक वाघे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.







