| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातला आहे. अनेक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत. अशातच नवीन पनवेल येथील ओम साई कलावंत मित्र मंडळातर्फे पूरग्रस्तांसाठी 25 हजारांचा धनादेश देण्यात आला आहे. पनवेलचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी पवन चांडक यांना ओम साई कलावंत मित्र मंडळ तर्फे पूरग्रस्तांसाठी 25 हजारांचा धनादेश देण्यात आला. यावेळी मंडळाचे सल्लागार व पनवेलचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, मंडळाचे अध्यक्ष हेमंत पुजारा व कार्याध्यक्ष नितीन चोरघे आदी उपस्थित होते.







