। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्या आरोपीला, तडीपारच्या आदेशाचे उल्लंघन करून हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय मोहिते असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पनवेल पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार अक्षय मोहिते याला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र, सदरचा हा तडीपार गुन्हेगार अक्षय मोहिते हा खारघर से 2 रेल्वे स्थानकाजवळ आला असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. आरोपीने पोलीस उपायुक्तांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरोधात खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक करत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.







