लायन्स क्लब खालापूरतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
लायन्स क्लब खालापूरने विविध उपक्रम हाती घेत असताना एक पाउल पुढे टाकले आहे. महड येथे असलेले वृद्धाश्रम, तसेच मनोरुग्ण संस्था महड येथे सर्व पदाधिकारी जाऊन त्यांच्या समवेत कोजागिरी सण मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात आला. या सणाच्या निमित्ताने त्यांचे अशिर्वाद घ्यावे, तसेच त्यांना आधार द्यावे, या उद्दात विचारांतून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
महड येथे आदित्य वृद्धाश्रम असून यामध्ये महिला वर्ग असून त्यांची देखरेख येथे होत आहे. मात्र प्रत्येक सण आपल्या कुटुंबासमवेत घालावावे अशी त्यांची सुद्धा मनोकामना असते. त्यांच्यातील ही उणीव भरुन काढण्यासाठी त्यांच्या समवेत काही वेळ घालवून, मनोबळ वाढवून गप्पांची रंगत आणली. तसेच, त्यांच्या समवेत काही वेळ घालवून मनोबळ वाढवून गप्पांची रंगत आणली. हा सण त्यांच्यासमवेत साजरा करावा यासाठी त्यांना जिवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.
तसेच, मनचकशू मनोरुग्ण संस्था महड येथेही हा सण साजरा करण्यात आला. यावेळी मसाला दूध, फळे, पाण्याच्या बॉटल तसेच डायपर पॅड, व प्राथमिक उपचारचे औषध साहित्य देण्यात आले. यावेळी लायन्स क्लब खालापूर अध्यक्ष किशोर पाटील, प्रोजेक्ट हेड शिवानी जंगम, अशोक पाटील, भरत पाटील, हरिभाऊ जाधव, ऋषी चाळके उपस्थित होते.





