| मुरुड | प्रतिनिधी |
मुरुडच्या शासकीय अन्नधान्य वितरण गोदामामधून धान्य भरून ते खार आंबोली येथील रेशनिंग दुकानदाराला वितरण करण्यासाठी पिकअप टेम्पो निघाला होता. परंतु, परेश नाका ते दस्तुरी नाका दरम्यानचा रस्ता अरूंद असल्यामुळे या ठिकाणी टेम्पोचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देत असताना धान्याने भरलेला टेम्पो साईडपट्टीवरून खाली कलंडला आणि अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून टेम्पो चालक अमोद शामा सुखरूप आहे. परेश नाका ते दस्तुरी नाका या मार्गावर अनेकदा अपघात होत असतात. त्यामुळे अनेकांना जिव सुद्धा गमवावे लागले आहे. तरी लवकरात लवकर या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी जनमानसातुन जोर धरत आहे.







