| पेण | प्रतिनिधी |
उच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक प्रक्रियेच्या कामाला वेग आला आहे. त्यामध्ये पेण नगरपालिकेत 12 प्रभागांमध्ये 24 जागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यात प्रभाग क्रमांक 1 ‘अ’ महिला ना.मा.प्र. व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 ‘अ’ महिला सर्वसाधारण व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 ‘अ’ ना.मा.प्र. महिला व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4 ‘अ’ सर्वसाधारण महिला व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5 ‘अ’ सर्वसाधारण महिला व ‘ब’ ना.मा.प्र. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6 ‘अ’ सर्वसाधारण महिला व ‘ब’ अनुसुचित जाती सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 ‘अ’ ना.मा.प्र महिला, व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 ‘अ’ सर्वसाधारण महिला व ‘ब’ ना.मा.प्र. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 ‘अ’ सर्वसाधारण महिला व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 ‘अ’ सर्वसाधारण महिला व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 11 ‘अ’ सर्वसाधारण महिला व ‘ब’ अनुसुचित जमाती सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 12 ‘अ’ सर्वसाधारण महिला व ‘ब’ ना.मा.प्र सर्वसाधारण असे आहेत. या आरक्षणामुळे इच्छुक उमेद्वारांची नक्कीच धाकधूक वाढली आहे. पेण नगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रांतधिकारी प्रविण पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागातील आरक्षणाची सोरट काढण्यात आली. या सोरटीसाठी मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी जीवन पाटील, प्रशासन अधिकारी गणेशसिंघ ठाकूर, नगरपालिका कर्मचारी, तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.






