| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते अरुण तेलंगे यांची शेकापक्षाच्या कामगार संघटनेच्या उरण तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे. शेकापक्षाचे तालुका चिटणीस तथा कामगार नेते रवी घरत व उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत यांनी अरुण तेलंगे यांचे अभिनंदन केले आहे.
अरुण तेलंगे गोर गरीबांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करत असून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे. एमआयडीसी या महामंडळात त्यांनी 40 वर्षे नोकरी केली आहे. तसेच, कामगारांच्या आग्रह खातर त्यांनी एमआयडीसीमधील एम्प्लाइज युनियनमध्ये महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदांची महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. एक उत्कृष्ट कामगार नेता ते सामाजिक कार्यकर्ता अशी जनमानसात ओळख असणाऱ्या अरुण तेलंगे यांना बाबासाहेब पुरंदरे, डॉ. प्रकाश आमटे व सिंधूताई सकपाळ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच, विविध संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी बोलताना तेलंगे म्हणाले की, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, तालुका चिटणीस तथा कामगार नेते रवी घरत तसेच इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे मत तालुका कामगार संघटक अरुण तेलंगे यांनी व्यक्त केले आहे.







