शेतकरी मीनेश गाडगीळ यांचा नाविन्यपूर्ण प्रयोग
| पनवेल | प्रतिनिधी |
गुळसुंदे, पनवेल येथील कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी मीनेश गाडगीळ हे नेहमी नाविन्यपूर्ण असे प्रयोग आपल्या शेतात करत असतात. त्यांनी आत्तापर्यंत ब्लॅक बर्मा, लाल, नीळा, जांभळा अशा प्रकारच्या पिग्मेंटेड राईसची आपल्या शेतात लागवड केलेली आहे.
यावर्षी त्यांनी व्हिएतनाम व्हरायटीचा ग्रीन राईस आपल्या गुळसुंदे येथील शेतात लागवड केला आहे. या तांदळात क्लोरोफील कंटेंट जास्त असल्याने या तांदळाला हिरवा रंग प्राप्त होतो. या तांदळास एक वेगळाच सुवास असतो. या तांदळाची ग्लॅयसेमिक इन्डेक्स कमी आहे. त्यामुळेच डायबेटीक पेशंट हा तांदूळ आपल्या आहारात घेऊ शकतात. ॲन्टी ऑक्सीडन्ट इफेक्ट या तांदळात आढळून येतो.
क्लोरोफील कंटेटमुळे शरीरातील टॉक्सीन न्युट्रल करण्याचा गुणधर्म या तांदळात आहे. साधारण 140 दिवसात तयार होणारे हे वाण आहे. एकरी 1500 किलोपर्यंत याचे उत्पादन मिळते.
मीनेश गाडगीळ यांनी थायलंडवरुन जस्मीन राईस बीयाणे आणले आहे. प्रयोगीक तत्वावर त्यांनी त्याची लागवड केलेली आहे व त्याचे पुढील वर्षासाठी बीयाणे तयार करण्याचे काम त्यांचे चालू आहे.
जस्मीन राईस हा सर्वात सुगंधी तांदूळ म्हणुन गणला जातो. पूर्वी रायगडमध्ये बथजीना कोलम नावाचे तांदळाचे पारंपारिक वाण होते. जे सद्ध्या नामशेष झाले आहे. त्याचीही लागवड मीनेश गाडगीळ यानी केलेली असून पुढील हंगामात त्याचे बीयाणे इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. वरील सर्व बीयाणांचे पारंपारिक पद्धतीत संर्वधन व जतन गाडगीळ यांनी केलेले आहे.
जमिनीची सुपीकता वाढते
हिरव्या भाताच्या लागवडीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून मातीची सुपीकता वाढवण्यासाठी हिरव्या खताचा वापर केला जातो. त्यामुळे शेती अधिक पर्यावरणपूरक होते. जमिनीची सुपीकता वाढते आणि मातीमध्ये नैसर्गिकरित्या पोषक तत्वांचे प्रमाण वाढते. तणांची वाढ कमी होते आणि मातीची धूप कमी होते.







