| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड समुद्रकिनारा सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून 11 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले असून, लवकरच समुद्र सुशोभीकरणाच्या काम झाल्याने मुरुडला पर्यटकांची संख्या वाढणार आहे. परंतु, गेली 5 महिने मुरुडला सतत पाऊस असल्याने मुरुडच्या समुद्रकिनारी पर्यटक फिरकले नाही. पाहुणे तर समुद्रकिनारी असलेल्या खाद्य वस्तूंच्या टपऱ्या बंदच होत्या त्यामुळे मंदीचे सावट आहे. टपरी धारक हताश झाला आहेत.
पालिकेने पद्मदुर्ग संस्थेत नोंदणी असलेल्या सर्व टपरी धारकांना हक्काची जागा द्यावी व एकसमान स्टॉल बांधून द्यावे अशी मागणी टपरीधारकाचे प्रमुख अरविंद गायकर यांनी केली आहे समुद्रकिनाऱ्याचा विकास होत असताना पर्यटकांना विविध सेवा पुरविणाऱ्या टपरीधारकांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. किनाऱ्याचे सौंदर्यीकरण होत असताना टपरीधारकांना गाळे देण्याचे प्रयोजन निश्चित केले असून त्यांना या जागेत वसवले जाणार आहे. टपरीधारकांनी कोणतीही चिंता करू नये सुशोभीकरण होत असताना टपरीधारकांचा एक प्रतिनिधी घेतला जाणार असून आपला सल्ला सुद्धा घेतला जाईल असा दिलासा गेल्यावर्षी देण्यात आला होता. पद्मदुर्ग व्यवसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी मुसळधार पावसामुळे समुद्रकिनारी असणाऱ्या टपरीधारकांचे नुकसान होत असते. शासनाकडून नुकसानग्रस्त टपरीधारकांना मोबदला दिला जावा अशी मागणी केली. भविष्यात मुरुड नगरपरिषदेकडून टपरीधारकांना गाळे मिळाल्यानंतर आम्हाला असेसमेन्ट देण्यात यावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.







