| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील डिकसळ गावावरून भिवपुरी रोड स्टेशन जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची मागणी भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना व स्थानिक प्रवासी करीत होते. तसेच, हा रस्ता होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड यांचे अनेक महिने प्रयत्न सुरू होते आणि त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी देण्यात आला असून या कामाची सुरुवात करण्यात आली आहे.
उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील डिकसळ येथे मोठ्या प्रमाणात वसाहती वाढत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरील कर्जत दिशेला असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात लोकलने येणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड वाढत आहे. त्यातच डिकसळ येथून भिवपूर रोड स्टेशनकडे येणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेचे किशोर गायकवाड यांच्या पाठपुराव्याने या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सुरवात करण्यात आली आहे.







