| रायगड | प्रतिनिधी |
सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतील कर्मचारीवर्ग व स्वल्पबचत प्रतिनिधींनी सेवाभावातून दिपावलीनिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत ॲड. जयेंद्र गुंजाळ संचलित श्री समर्थकृपा वृद्धाश्रम परहुर या संस्थेला 25 हजार रुपयांच्या डिमांड ड्राफ्टद्वारे आर्थिक सहाय्य करण्यात आले. हा डिमांड ड्राफ्ट संस्थेचे व्यवस्थापक वैभव बोर्लीकर यांच्या हस्ते वृद्धाश्रमास प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेश मगर, संचालक हरेश गायकर, मोहन वैद्य, तसेच कर्मचारी मयुरी ठाकूर, गणेश मौर्य, नरेंद्र पाटील, वैष्णवी पिंपळे, निलेश पाटील, रिया पाटील, पूर्वजा वेताळ, शुभम सुंकले, स्वल्पबचत प्रतिनिधी सुनिल तांडेल, अनिल आंबोले, गितेश गुरव, संदेश कवळे आणि जितु शिगवण आदी उपस्थित होते.





