| पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील मारुती गायकवाड यांची ऑल इंडिया पँथर संघटनेच्या सुधागड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड पँथर संघटनेचे प्रमुख व राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत वासुंडे येथील फार्महाऊसवर झालेल्या संघटनेच्या विशेष बैठकीत एकमताने करण्यात आली. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. नव्याने तालुका अध्यक्ष झालेल्या मारुती गायकवाड यांनी संघटनेच्या कार्याचा वेग वाढवून, समाजातील उपेक्षित घटकांच्या न्यायासाठी आणि देशभरातील दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.







