| नवी दिल्ली | प्रतिनिधी |
सोन्याचा भाव 0.8 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1 लाख 22 हजार 400 वर उघडला. मागील व्यवहारात तो 1 लाख 23 हजार 451 होता. सोन्यासोबतच चांदीचा भावतही मोठी घसरण झाली आहे. चांदी तब्बल 3.09 टक्क्यांनी घसरून 1 लाख 42 हजार 910 प्रति किलोवर उघडली. मागील सत्रात चांदी 1 लाख 47 हजार 470 प्रतिकिलोवर होती. सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 771 रुपयांनी घसरून 1 लाख 22 हजार 680 प्रति 10 ग्रॅमवर आला, तर चांदी 576 रुपयांनी घसरून 1 लाख 46 हजार 894 प्रतिकिलोवर व्यवहार करत होती.
अमेरिका-चीन व्यापार तणावात सुधारणा दिसत असल्याने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ओळख असलेल्या सोन्याच्या गुंतवणुकीचा कल कमी झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव कमी झाला आहे. सोबतच, डॉलर मजबूत झाल्याने इतर चलनधारकांसाठी सोने महाग झाले आहे. गुंतवणूकदार सध्या जगातील प्रमुख सेंट्रल बँकांच्या या आठवड्यात होणाऱ्या धोरणात्मक बैठकीकडे लक्ष ठेवून आहेत. या बैठकीतून व्याजदर आणि महागाईबाबत महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर होऊ शकतो. त्यामुळे सद्यःस्थितीत आंतरराष्ट्रीय सोने बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याचे दिसत आहे.






