| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
800 मिलिग्रॅम वजन असलेला हायड्रो गांजा थायलंड येथून मित्रांच्या मदतीने छुप्या मार्गाने मागून बेकायदेशीर रित्या विक्री करता स्वतःच्या ताब्यात बाळगले प्रकरणी आरोपी केयूर जयेश गोगरी, राहणार सेक्टर 19 खारघर याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात 30 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
खारघर सेक्टर 19, शिवसाई बिल्डिंग, रूम नंबर 302 येथे राहणारा केयूर जयेश गोगरी हा त्याच्या घरामध्ये हायड्रो गांजा या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. घरात अमली पदार्थ सापडले नाही. मात्र, कारची झडती घेतली असता कार मध्ये एका पिशवीत हायड्रो गांजा सापडून आला. याप्रकरणी केयूर जयेश गोगरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.







