नेताजी पालकर मंडळ चौकचा स्तुत्य उपक्रम
। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
चौक हे ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी सरनौबत नेताजी पालकर यांचे हे जन्म गाव म्हणून प्रसिध्द आहे. अशा या इतिहासकालीन असलेले चौक या परिसरातील सात गावे येथे दिवाळीमध्ये चिमुकल्यांनी बनविलेले किल्ले स्पर्धेचे आयोजन तसेच परीक्षण गेली 40 वर्ष नेताजी पालकर मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे. यावेळी किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण हनुमान मंदिर चौक येथे आयोजित करण्यात आले.
मंडळाचे संघटक रायगड भूषण यशवंत सकपाळ यांनी प्रास्ताविकास मंडळाचे 40 वर्षातील केलेले कार्य कथन केले. या उपक्रमाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात गायक अनंत पवार यांच्या देशभक्तीने गीताने झाली. शौर्य समीर शिंदे, भक्ती विनायक पवार, वैदेही अंकित नेरकर या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर व्याख्यान दिले. यावेळी मंडळाचे कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार निसर्ग मित्र पनवेल सुरेश घाडगे यांनी नेताजी पालकर यांच्या जन्मस्थळी व्यक्त केले.
यावेळी व्यापारी सामाजिक संस्था चौक अध्यक्ष हर्षल हनुमंते, शिवदेश सामाजिक संस्थेचे शिवाजीराव देशमुख, सुरेश चौधरी, युवा नेते फिरोजचे शेख, प्रज्ञा वत्सराज, आनंद गायकवाड, ज्ञानेश्वर गडगे, इतिहास अभ्यासक अशोक मोरे आदी मान्यवर उपस्थित होत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक स्पर्धा प्रमुख भूषण पिंगळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेताजी सेवक बाबुराव चौधरी, अनिल खंडागळे, अमोल सकपाळ, चंद्रकांत चौधरी, रितेश माळी आदींनी मेहनत घेतली.







