‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटात जुईली टेमकरची प्रमुख भूमिका
| अलिबाग | प्रतिनिधी |
हास्यजत्रा फेमस श्रमेश बेटकर आणि जुईली टेमकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘लास्ट स्टॉप खांदा’ महाराष्ट्रात एकूण 75 चित्रपटगृहात 21 नोव्हेंबरला धूमधडाक्यात प्रदर्शित होणार आहे.
निर्मिती शिवम फिल्म क्रिएशन, सिग्नेचर ट्युन्स आणि स्नेहा प्रॉडक्शन्स यांची असून, निर्माते प्रदीप जाधव, सहनिर्माते सचिन कदम, अमृता जाधव आहेत. चित्रपटाचे लेखन श्रमेश बेटकर यांनी केले आहे, तर दिग्दर्शन विनित परुळेकर यांचे आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांची प्रस्तुती आहे. या चित्रपटात हास्यजत्रा फेम अभिनेता श्रमेश बेटकर, अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने,मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर आणि अशोक ढगे प्रमुख पाहुणे कलाकार आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचे छायांकन हरेश सावंत, कला दिग्दर्शन केशव ठाकूर, संगीत श्रेयस राज आंगणे, तर नृत्यदिग्दर्शन राहुल बनसोडे, रवी आखाडे यांनी केले.
“शालू झोका दे गो मैना” हे चित्रपटाचे गाणे अतिशय लोकप्रिय झाले आहे. या चित्रपटात मनोरंजक प्रेमाची गोष्ट असून, अतिशय चढ-उतार असलेले कथानक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तरी, प्रेक्षकांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा, असे कलाकारांनी आवाहन केले आहे.







