वाहनचालकांची मोठी गैरसोय
| पनवेल | प्रतिनिधी |
सायन-पनवेल महामार्गावरील नवी मुंबई ते पनवेल परिसरातील अनेक महानगर गॅस पंप बंद असल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. काही सीएनजी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी गॅस लाईन्स तात्पुरत्या बंद ठेवल्याने पंपांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी तसेच खासगी वाहन चालक त्रस्त झाले असून, लांब अंतराचा प्रवास करणाऱ्यांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे.







