| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा एस.टी. बसस्थानक आवारात पडलेले खड्डे व बेशिस्तीने केलेली वाहन पार्किंग यामुळे अपघातास निमंत्रण ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रेवदंडा एसटी बस स्थानक हे अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्याला मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातून येणाऱ्या बसेस रेवदंडा एसटी आगारातून ये-जा करत असतात. त्यामुळे याठिकाणी प्रवासीवर्ग व स्थानिकां वदर्ळ असते. परंतु, यंदाच्या पावसाळ्यात रेवदंडा बस स्थानक आवारात पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून तळी निर्माण झाली होती. आता पाऊस थांबला असून हे खड्डे कोरडे पडल्यामुळे निदर्शनास येत आहेत. या स्थानकात जेव्हा एसटी येते तेव्हा तिला या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे एसटीतील प्रवाशांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच, हे खड्डे चुकविताना वाहन चालकांना देखील तारेवरची कसरत करावी लागते. तसेच या बस स्थानक आवारात बेशिस्ती पणे लहान-मोठी उभी करून ठेवली जातात. त्यामुळे स्थानकात येणाऱ्या बसला त्याचा आडथळा होतो. त्यामुळे रेवदंडा स्थानकातील खड्डे व बेशिस्त पार्किंग अपघाताला निमंत्राण ठरत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून बस स्थानक आवारातील रस्त्याची पुनर्बांधणी करावी, तसेच बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. परंतु, एसटी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवासीवर्ग व स्थानिक ग्रामस्थांकडून संप्तत प्रतिक्रिया उमटत आहेत.







