| रेवदंडा | प्रतिनिधी |
बेलोशी ग्रामपंचायत अंतर्गत वळवळी आदिवासी वाडी येथे उसर गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या कॉपोरेट पर्यावरण दायित्व विभागाच्या सिईआर अंतर्गत पाणी साठवण टाकी बांधण्यात आली. या पाणी साठवण टाकीचा उद्घाटन सोहळा गुरूवारी (दि.20) बेलोशी ग्रामपंचायतीच्या मार्फत आयोजीत करण्यात आला होता.
उसर गेल इंडिया कंपनीचे कार्यकारी निर्देशक अनुप गुप्ता यांच्या हस्ते या पाणी साळवण टाकीचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर धोकवडे तलाव सरक्षंण भिंत, महाजने नदी सरक्षंण भिंत, कळकीचा टेप येथील बंधारा, गाणीच्या तलावास सरक्षंण भिंत इत्यादी कामांचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या कॉपोरेंट पर्यावरण दायित्व सिईआर अंतर्गत विविध उपक्रमाव्दारे शाश्वत विकासाला चालना देते. या कपंनीचे अलिबाग तालुक्यात उसर येथे प्रोपेन डिहायड्रोजेनेशन पॉलिप्रोपायलीन पिडीएच पी पी प्रकल्पाअंतर्गत कंपनी परिसरातील आसपासच्या गावाच्या विकासासाठी कॉपोरेट पर्यावरण दायित्वाच्या सिईआर अंतर्गत अनेक सार्वजनिक विकासात्मक कामे हाती घेतली आहेत.
ही सर्व कामे सिईआर योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे परिसरातील स्थानिक ग्रामपंचायतीचे व्दारे आणी रायगड जिल्हा परिषदेच्या नियत्रंणामार्फत केली जात आहेत. तयामध्ये पिण्याचे पाण्याचे आर ओ प्लॅंट, पाणी साठवणीचा टाक्या, सौरपथ दिवे, शाळा-अंगणवाडयांचे सुशोभिकरण आणि डिजिटलाझेशन, तलावाचे बांधकाम, बस स्टँड बांधकाम, उंच प्रकाशस्तंभ असलेली लाईट इत्यादी पायाभुत सुविधांचा समावेश आहे. यावेळी उसर गेल इंडिया कंपनीचे कार्यकारी निर्देशक अनुप गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीसह कंपनीचे महाप्रंबधक मानव प्रसंसाधन विभागाचे जितिन सक्सैना, उप महाप्रबंधक जी.एस.नागेवाडी तसेच बेलोशी ग्रामपंचायतीचे प्रशासक अधिकारी अनिल गोतकर, अधिकारी देवगंना वेटकोळी,माजी सरपंच कृष्णा भोपी, नारायण कातकरी, माजी सदस्य संदिप भोईर, गणिता कारभारी, उदय सांदणकर, प्रचिती पाटील, नंदकुमार काटले, अनंता औचटकर यांच्यासह गिरीष पाटील, नरेश ठाकूर, केतन भोपी, रोशन भोपी, सुधाकर भोपी, मुकेश भोपी, प्रविण राणे, व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन राकेश भोपी यांनी केले.







