उमेदवारांनी मतदारांची घेतली गृहभेट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शेकाप व काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार वेगात सुरु झाला आहे. अलिबागमधील प्रभाग तीनमधील नगरसेवकपदाचे उमेदवार डॉ. साक्षी गौतम पाटील आणि आनंद अशोक पाटील यांचा प्रचार शनिवारी चेंढऱ्यामध्ये करण्यात आला. यावेळी असंख्य कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रचाराचा झंझावात यावेळी पाहावयास मिळाला. एक वेगळा उत्साह घेऊन कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला जोमाने लागले आहेत. घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रभाग तीनमधील नगरसेवक पदाच्या उमेदवार साक्षी गौतम पाटील व आनंद पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.22) सायंकाळी चेंढरे परिसरात प्रचार करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करीत प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी अलिबागमधील सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय व वाचनालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका अश्विनी पाटील, विकास पाटील, रवि आंबेकर, साधना पाटील, प्रशांत आंबेकर, सुजित रोकडे, सुशांत पाटील, बाळा पाटील, सागर आंबेकर, बाबू वेलकर, उदय ठाकूर, अश्वीन लालन, प्रकाश राठोड आदी शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक पदाचे उमेदवार साक्षी पाटील आणि आनंद पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत चेंढरे परिसरातील घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. या उमेदवारांचे आगमन होताच, मतदारांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेकांनी उमेदवारांचे औक्षण करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मतदारांकडून मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे बहुमतांनी विजयी होण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी एक वेगळा उत्साह प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये दिसून आला.







