| चिरनेर | प्रतिनिधी |
परभणी येथील एस.के.एम फाऊंडेशन संस्थेतर्फे रुद्रांश करिअर अकॅडमी जेएनपीटी, उरण यांच्या विद्यार्थांची आगामी येणारी पोलीस भरती, सैन्य भरती तसेच लेखी चाचणी व शारीरिक फिटनेस परीक्षा घेतली असता, पहिल्या तीन क्रमांकांच्या मानकरी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी भारत कांस्यपदकाचे मानकरी हरेश्वर ठाकूर उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शन वेळेचे नियोजन असावे, 24 तासांमधून शरीरासाठी प्रात्यक्षिक महत्त्वाचे असल्याचे समजावून सांगितले. मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी मनात साठवणूक ठेवणे हे योग्य नाही तसेच शारीरिक ताणतणावाबाबत विद्यार्थ्यांना योगा, जिम, चालणे किंवा महत्त्वाचे धावणे याबाबत मार्गदर्शन केले. प्रशांत जेना तसेच अनुजेना मॅडम यांनी भगवद्गीतामधील काही उदाहरणे देऊन मैदान कसे लढवायचं याबाबत सांगितलं. सोनल तांडेल यांनी त्यांच्या रायगड जिल्हास्तरीय कराटे चॅम्पियनबाबत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त असणे आवश्यक आहे, स्ट्रेचिंगबाबत महत्त्वाच्या टिप्स दिल्या. महाराष्ट्र पोलीस आकाश धोके यांनी पोलीस भरतीमध्ये कशी तयारी करावी, नियोजन कसे करावे, अभ्यास किती तास असावा, मैदानाची तयारी केल्यानंतर डेली डायट कसा असावा, कोणती पुस्तकं वाचावी याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमात प्रथम, द्वितीय आणि उत्कृष्ट पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तक देऊन गौरविण्यात आले. यात साक्षी (प्रथम), वनिता आटपाडकर (द्वितीय) क्रमांकच्या मानकरी ठरल्या, तसेच ऋषिकेश कोळी, माया पायल रोशन व करण उत्कृष्ट पारितोषिकाचे मानकरी ठरले. त्यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राजेश म्हात्रे नागरी संरक्षण दल पेण तालुका हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राणी वडगावकर (सचिव), राहुल डाके (उपाध्यक्ष), विठ्ठल फड, अनिकेत गीते, सुग्रीम प्रजापति, ऋषिकेश गरकर यांनी केले होते. आभार प्रदर्शन करत असताना संस्थापिका गुंजन निषाद त्यांनी व्यासपीठासोबत मुलांचेही कौतुक केले.







