| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात दहा नगरपंचायत, नगरपालिका निवडणुका पार पडत आहेत. येत्या 2 डिसेंबरला निवडणुका पार पडत असून 3 डिसेंबरला निकाल घोषित होणार आहेत. रायगड जिल्ह्यात दहा नगरपंचायत, नगरपालिका आदर्श आचारसंहिता लागू असून निवडणूक कालावधीत आदेश आचारसंहितचे योग्य पालन करावे असे, कोकण विभाग पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी आढावा दौऱ्यनिमित माणगाव येथील पत्रकारांशी संवाद साधला.
नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कोकण विभाग पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी 25 नोव्हेंबर रोजी आढावा दौऱ्यानिमित्त माणगाव शासकीय विश्रामगृह माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस महानिरीक्षक संजय दराडे म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील दहा नगरपंचायत, नगरपालिका हद्दीत आदर्श आचारसंहिता सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत पोलीसांवर महत्वाची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने लागणारा बंदोबस्त व करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून मार्गदर्शन आढावा दौरा करीत आहे. संवेदनशील ठिकाणी तसेच आचारसंहिता लागू असणाऱ्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर असून निवडणूक आचारसंहिता योग्य रीतीने पार पडेल. यावेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधिकारी उपस्थित होते.







