| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील अभिनव ज्ञान प्रबोधनीच्या शारदा मंदिर शाळेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाषा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत निर्धार यशाचा या माध्यमातून विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी अनेक क्लृप्त्यांचे मार्गदर्शन करण्यात आले.
अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्यु. ट्रस्टचे शारदा मंदिर कर्जत शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शाळेत भाषण कला प्रशिक्षण अंतर्गत ‘निर्धार यशाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याते शशांक मोहिते यांचे ‘निर्धार यशाचा’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली किसवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रद्धा जामघरे यांनी केले. शारदा मंदिर मंदिर इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका छाया नगरकर तसेच शिक्षक आणि पालकांची या कार्यशाळेत उपस्थिती होती. दोन तासांच्या या ज्ञानवर्धक कार्यक्रमाचा आस्वाद विद्यार्थी व शिक्षकांनी अतिशय उत्साहाने घेतला.







