| उरण | प्रतिनिधी |
चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगडचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षे समाजसेवेचे उपक्रम राबवत आहे. आज आदर्श शाळा तालुका हा उपक्रम हाती घेऊन रायगड जिल्हातील प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा निवडत आहे. त्याप्रमाणे पनवेल तालुक्यामधून सुधागड एज्युकेशन सोसायटी या शाळेला पनवेल तालुका आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार आवाज महामुंबईचा न्यूज चॅनलचे संपादक मिलिंद खारपाटील (सल्लागार) यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका गावित मॅडम यांनी स्वीकारला. यावेळी गावित मॅडम म्हणाल्या की, ‘आमच्या शाळेला आदर्श शाळा म्हणून पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मी चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगडचे आभारी आहे. यापुढे आमची जबाबदारी वाढली असून, शाळेतील मुलांचा जास्तीत जास्त विकास कसा होईल, यागोष्टीवर भर देण्यात येईल.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संतोष तांबोळी (माजी सरपंच), संतोष गायकर (माजी उपसरपंच), वैभव गायकर (पत्रकार), ज्येष्ठ नागरिक सीताराम म्हात्रे (मीडिया सल्लगार) यांची उपस्थिती होती. तर, शाळेतर्फे नूतन जगताप, बाळासाहेब सोलासे, प्रकाश पाटील, लक्ष्मण इगोले, सुप्रिया लांडगे, जयसिंग थोरात, संतोष पाटील, सुनील निकुंभ, वैशाली पाटील, संगीता मगरे, जाकीरहुसेन मान्सूरी व कर्मचारी उपस्थित होते.







