| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात गडकिल्ले संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिवशंभो युवा हायकर्सकडून किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते.
शिवशंभो युवा हायकर्स यांच्या माध्यमातून कर्जत शहरातील बालकलाकार यांच्यासाठी किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कर्जत येथील भजनभूषण गजानन पाटील स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. नितीन भोपतराव तसेच महेश वैद्य, व्यंग चित्रकार विशाल सुरावकर, ऋषिकेश दानवे आणि प्रसादबुवा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कदम यांनी तर प्रास्ताविक शैलेश सातपुते यांनी केले. श्री छत्रपती शिवाजी मंडळाचे पदाधिकारी चित्रकार राजेंद्र दगडे , श्री छत्रपती स्मारक समितीचे पदाधिकारी प्रेमनाथ गोसावी तसेच योगेश भरकले, अखंड कोथळीगड संवर्धन समितीचे समन्वयक समाधान पाटील, रामचंद्र हजारे आणि परिसरातील शिवप्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेत सार्वजनिक गटामध्ये प्रथम क्रमांक शिवमल्हार गट, दहिवली, किल्ले लोहगड द्वितीय क्रमांक कृष्णाई गट भिसेगाव, किल्ले राजगड तृतीय क्रमांक नवतरुण ओमकार मित्रमंडळ गट, दहिवली किल्ले रायगड तसेच घरगुती किल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक शंतनू मालुसरे दहिवली किल्ले पेठ, द्वितीय क्रमांक आर्या हजारे भिसेगाव किल्ले सिंधुदुर्ग तृतीय क्रमांक स्वरा हजारे, भिसेगाव किल्ले खांदेरी तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली.







