| पनवेल | प्रतिनिधी |
धार्मिक उपवास-व्रतवैकल्ये, पूजेसाठीची फळे, थंडीतील पोषणासाठीची फळे खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे बाजारात 10 ते 20 टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत. मार्गशीर्ष महिन्यात उपवास, पूजेसाठी लागणाऱ्या फळांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. किरकोळ बाजारात तर पूजेसाठी लागणाऱ्या पाच फळांचे वाटे तयार करून विकले जातात. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना चांगला नफा मिळत आहे. बाजारात संत्री, मोसंबी, पेरू, सीताफळ, सफरचंद, कलिंगड अशा फळांसोबतच परदेशी फळांची आवक वाढली आहे. त्याचबरोबर अंजीर, द्राक्ष, बोर, स्ट्रॉबेरी, अमरफळ, चिकू, खरबूज बाजारात उपलब्ध आहेत.
फळांचे प्रकार सध्याचे भाव (प्रतिकिलो)
अननस - 40, अंजीर - 50-60, बोर - 40-50, चिकू - 40-50, डाळिंब - 150-200, ड्रॅगन फ्रूट - 90, कलिंगड - 15-20, केळी - 30-40, मोसंबी - 50-60, पपई - 15-20, पेरू - 55-60, संत्रे - 40-50, सीताफळ - 50-60, स्ट्रॉबेरी - 350-450, खरबूज - 35-45.







