| मुंबई | प्रतिनिधी |
नवोदित मुंबई श्रीच्या निमित्ताने शास्त्रीनगर मैदान शरीरसौष्ठवपटू आणि क्रीडाप्रेमींच्या गर्दीने अक्षरशा ओसंडून वाहात होतं. स्पर्धा नवोदितांची असली तरी स्पर्धेला लाभलेला अभूतपूर्व आणि विक्रमी प्रतिसाद बृहनमुंबई शरीरसौष्ठव संघटनेची वाढलेली खरी ताकद दाखवून गेला. अत्यंत चुरशीच्या लढतीत मनवोदित मुंबई श्रीचा मान विराज फिटनेसच्या साजिद मलिकने मिळवला. 235 खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक वजनी गटात इतकी चुरस होती की, अव्वल पाच खेळाडू निवडताना जजेसना तीनदा पंपेरिजन करावी लागली. स्पर्धेचे पुरस्कार वितरण आयोजक अजय विचारे, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब, सुनील शेगडे, राजेश निकम यांच्या उपस्थितीत पार पडला.
नवोदित मुंबई श्री 2025 चे गटवार विजेते
55 किलो – 1. रमण राठोड (बोवलेकर जिम),
60 किलो – 1. धर्मराज जमादार (एम जे 52 फिटनेस), 65 किलो 1. प्रतीक महाजन (विराज फिटनेस),
70 किलो – 1. साजिद मलिक (विराज फिटनेस)
75 किलो – 1. हरीश साळुंखे (परब फिटनेस),
80 किलो – 1. फ्रान्सिको फर्नाडिस (सावरकर जिम), 80 किलोवरील 1. तुषार वाघ (एज फिटनेस),







