| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी बनवलेल्या चामड्याच्या वस्तू नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. या वस्तूंना आंतराराष्ट्रीय प्रदर्शनात मोठी मागणी असल्याचे दिसून येत असून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माथेरानमधील चामड्याच्या वस्तूंचे कौतुक केले.
माथेरानमधील ओम लेदर आर्टमध्ये बनविण्यात आलेली चर्म उत्पादने नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहेत. या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माथेरानचे चर्म उद्योजक चंद्रकांत काळे आणि हर्षदा काळे यांनी आपल्या चप्पल, बुट व सँडल अशा चर्म वस्तूंचे स्टॉल आंतरराष्ट्रीय व्यापार मेला प्रदर्शनामध्ये मांडले होते. माथेरानच्या कोल्हापुरी आणि फॅन्सी चपलांना देखील दिल्लीच्या ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यादरम्यान, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सावंत यांनी स्वतः माथेरानच्या चर्मोद्योग ओम लेदर आर्ट स्टॉलला भेट देऊन चर्म उत्पादनाची पाहणी केली. त्यावेळी चंद्रकांत काळे यांच्या चर्मवस्तूंच्या कारागिरीची स्तुती केली आहे. भारतभर व प्ररदेशात आपला चर्मोद्योग पोहोचवणारे चंद्रकांत काळे आणि हर्षदा काळे यांनी आपल्या चर्मोद्योग व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटक स्थळ माथेरानचे नाव दर्जेदार उत्पादनाच्या माध्यमातून अव्वल स्थानी पोहोचवले आहे. आपल्या या व्यवसायाच्या सफलतेमुळे स्वतः चंद्रकांत काळे व हर्षदा काळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.







