| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन नरवीर तानाजी विद्यालय देवळे येथे करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील सर्व शाळेतून सुमारे 40 प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. यावेळी देवळे विद्यालयाचे विज्ञान शिक्षक सुखलाल बागुल यांनी तयार केलेली ‘चांद्रयान 3′ ही प्रतिकृती विशेष आकर्षण ठरली. यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत कळंबे, शैलेश सलागरे, ज्ञानदेव केसरकर, तुकाराम केसरकर, सुभाष साळुंखे, सुरेश साबळे, मारुती कळंबे, विजय पवार, ज्ञानोबा रेणोसे, विक्रम केसरकर, शिवाजी केसरकर, आनंद केसरकर, विनायक केसरकर, धर्मेंद्र रिंगे, राकेश पिंगळा, किसन सुरवसे, नवाज तांबोळी, टी.डी. जाधव, सुनील शिंदे, विद्याधर कोळसकर आदि मान्यवरांसह बहुसंख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बाल वैज्ञानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







