| नेरळ | प्रतिनिधी |
विद्या मंदिर मंडळ संचालित नेरळ ममदापूर येथील मातोश्री टिपणीस महाविद्यालय यांच्याकडून दरवर्षी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी दि. 11 डिसेंबर रोजी ही स्पर्धा होत असून ही या सर्धेचे नववे वर्षे आहे. या स्पर्धेसाठी समाजातील दैनदिन घडामोडी यांच्याबाबतचे अनेक विषय ठेवण्यात आले होते. त्यात 1- शेतकरी कर्जमुक्त कधी होणार? 2- सध्याच्या राजकारण लोकशाहीचा उत्सव की ढोंग, 3- समाजमाध्यम अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यासपीठ आणि अफवांचा बाजार, 4- भारतीय कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक बांधिलकी आणि 5- आरक्षण जातीनिहाय की आर्थिक निकषांवर, असे पाच विषय देण्यात आले आहेत. तरी महाविद्यालयांनी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.







