। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
नागावमध्ये बिबट्याचा ठावठिकाणा सापडला असून, वनविभाग सतर्क झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. बिबट्याच्या हालचालींचा अंदाज घेऊन जाळे टाकण्यात येत आहे. त्यासाठी वनविभागाकडून ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा ठावठिकाणा शोधण्याचे काम, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम करण्यात येत आहे. दरम्यान, याठिकाणी बघ्यांची एकच गर्दी झाली आहे. सर्वांनी शांत राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.







