। पनवेल । वार्ताहर ।
आळंदी येथे पायी दर्शनाला जातो, असे सांगून वलप येथील राहत्या घरातून गेलेला 28 वर्षीय तरुण अद्याप घरी परत आला नाही. त्यामुळे तो हरवला असल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. परेश टेंभे असे त्याचे नाव असून, तो साई मंदिर-वलप येथे राहणारा आहे. त्याची उंची पाच फूट सहा इंच, रंग गोरा, वाढलेली दाढी, मिशी वाढलेली आहे. त्याला आगरी आणि मराठी भाषा बोलता येते. मात्र, कमी ऐकू येते. त्याने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि राखाडी रंगाची जीन्स पँट परिधान केली आहे. असा तरुण कोणाला आढळल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसंनी केले आहे.







