| रसायनी | प्रतिनिधी |
सातवी सिनियर सिटीझन ओपन नॅशनल ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा सच्छिंद्राबाद हैद्राबाद उनमैय्या युनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स ग्राऊंड येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये रसायनीतील रिस कांबे गावचे रहिवासी घनश्याम श्रीकृष्ण मशिलकर यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पाताळगंगा यांच्यातर्फे खेळून रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी रायगड जिल्ह्याचे नाव हैद्राबादपर्यंत पोहोचवण्याचा मान मिळविला आहे. घनश्याम श्रीकृष्ण मशिलकर यांनी 55 वर्षांवरील गटात लांब उडी, तिहेरी उडी, सुवर्णपदक, तर गोळा फेकमध्ये कांस्यपदक पटकावून नावलौकिक केले आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे घनःश्याम श्रीकृष्ण मशिलकर यांनी रसायनीसह रायगड जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.







