| महाड | प्रतिनिधी |
लोकविकास सामाजिक संस्थेच्या एम.एम. जगताप महाविद्यालय महाड येथे दरवर्षी प्रमाणे सांस्कृतिक विभागाच्यावतीने सांस्कृतिक दिवस व विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. नुकतेच या समारंभाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजय धनावडे यांनी आपल्या प्रस्तावनेत सांस्कृतिक दिन, विविध स्पर्धा, क्रीडा कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक दिनाचे व विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे, संस्थेचे विश्वस्त व माजी नगराध्यक्ष संदिप जाधव यांनी सांस्कृतिक दिन, क्रीडा प्रकार हे सामाजिक जडनघणीशी जोडलेले असतात, असे सांगून स्वर्गीय आबांच्या आठवणींना उजाळा दिला. भूपेश पाटील व रोहीत पोरे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन नियोजित कार्यक्रमांसाठी शुभेच्या दिल्या. तसेच, कनिष्ठ कॉलेजच्या प्राचार्या गीतांजली पाटील यांनी अभ्यास, क्रीडा व संस्कृती यांचे अनोखे बंधन त्यांच्या मनोगतातून व्याक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त संजय चिखले यांनी सांस्कृतिक दिन व क्रीडा स्पर्धा म्हणजे संघटिक उपक्रम असून विद्यार्थ्यांच्या कलात्मक, ऐतिहासिक व सामाजिक पैलूंचा उत्सव साजरा करणे आहे, हे करताना मुलांनी सामाजिक नियमांचे व चौकटिंचे पालन करावे, असे आवाहन केले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख गायत्री करमरकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडून सांस्कृतिक दिन, विविध क्रीडा प्रकार यातून एक सांस्कृतिक जडणघडण आणि वारसा जतन होतो, असे विचार व्यक्त सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. या सोहळ्याला महाविद्यालयाचे विश्वस्त व पदाधीकारी संजय चिखले, संदिप जाधव, भूपेश पाटील, रोहीत पोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजय धनावडै, प्राचार्य गीतोजली पाटील, सर्व प्राध्यपक, प्राध्यापकेतर वर्ग व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.







