। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
मुंबई – गोवा मार्गावर डंपर आणि ट्रॅव्हल्स बसचा मंगळवारी (दि.16) रात्री अपघात झाला. या अपघातामध्ये वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. पेण लेनवरील शिरढोण पूलावर झालेल्या अपघातामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली. बस काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.







