। खांब । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील दीपक नायट्राईट कंपनी, धाटाव आणि दीपक फाउंडेशन, रोहा यांच्या दीपक फाउंडेशन, रोहा यांच्या वतीने तालुक्यातील तळाघर येथे जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.18) मृदा संवर्धन या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. विषयतज्ज्ञ (फलोत्पादन) कृषी विज्ञान केंद्र येथील राजेश मांजरेकर, कृषी सहाय्यक रेशमा यांनी सुपीक व निरोगी मातीचे महत्त्व, मृदा संवर्धन आणि शाश्वत शेती या विषयावर आधारित मौल्यवान मार्गदर्शन व माहिती उपस्थितीतांना दिली. या प्रशिक्षणासाठी प्रोजेक्ट यंग सायंटिस्ट (एसटीईएम) अंतर्गत रा.जि.प शाळा तळाघर येथील 29 विद्यार्थी व 15 शेतकरी उपस्थित होते.







