| रसायनी | प्रतिनिधी |
शेतामध्ये कडधान्य पेरल्यावर शेतकऱ्याला जंगलातील रानटी प्राण्यांची भीती असते, शिवाय पक्षीही शेतामध्ये पेरलेल्या कडधान्याची नासधूस करीत असतात. पूर्वीपासून शेताचे संरक्षण करण्यासाठी बुजगावणे शेतात उभे केल्यामुळे कडधान्य पिकांचे नुकसान टळले जाते. सातत्याने पिकांचे रक्षण करणे हे शेतकऱ्याला शक्य नसते. तसेचं शेतामध्ये पेरलेल्या कडधान्याने बहरल्याने त्यांच्या सुवासाने, रानटी पक्षी, प्राणी, मोकाट गुरे शेतात प्रवेश करतात. त्यामुळे शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागते. ते होऊ नये म्हणून शेतकरी शेतात बुजगावणे उभे करून पिकांची होणारी नासधूस थांबवित आहेत. बुजगावणे माणसाप्रमाणे दिसत असल्याने शेतात रानटी पक्षी, प्राणी, मोकाट गुरे प्रवेश करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला या बुजगावण्यापासून मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. शेतकरी शेतामध्ये वाल, मूग, हरभरे, मटकी, मका, भाजीपालाही पिकवत आहेत. बुजगावणे या पिकांचे संरक्षण करीत आहेत.







