| भाकरवड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील विराज बैकर याने अवघ्या विसाव्या वर्षी पायलट होण्याचा मान पटकावला आहे. विराज बैकर याचे पायलट होण्याचे स्वप्न होते. ही गोष्ट त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी खूप मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मुलाचे स्वप्न पुर्ण करण्यास मदत केली. विराजने बारावीनंतर बारामतीमध्ये एंट्रन्स एक्झाम परीक्षा उत्तीर्ण होऊन मेडिकल टेस्ट आणि फ्लाईंग ट्रेनिंग दोन वर्षात पूर्ण केली. त्यानंतर कार्व्हर इव्हिनेशन म्हणून पायलट झाला. यावेळी बोलताना विराज म्हणाला की, “मी पायलट झालो, त्यामागे माझे वडील राजेश बैकर व आई वैशाली बैकर यांच्यासह माझ्या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे मत त्याने व्यक्त केले आहे. दरम्यान, आगरी समाजाचे सुपुत्र कुमार विराज बैकर याने वैमानिक प्रशिक्षण विक्रमी वेळेत यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या निवासस्थानी सुशांत पाटील, रमेश तुंनतुने, मनोज ठाकूर, अरुण पाटील, प्रदीप परांगे आदींनी भेट दिली.






