रायगडात होणार मुलींच्या क्रिकेट स्पर्धा; एमसीएमचा आयोजनासाठी पुढाकार
| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणीस वर्षाखालील मुलींच्या एकदिवसीय 50 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील 15 सामन्यांचे आयोजन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील विविध मैदानांवर दि. 29 डिसेंबर ते 04 जानेवारीदरम्यान होणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान पेण,छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण गव्हाण, उलवे व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स ग्राउंड रसायनी पाताळगंगा अशा तीन मैदानावर हे सामना खेळवले जाणार असून एमसीएच्या ग्रुप जी मध्ये सहा संघांचा समावेश असणार आहे, त्यात रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींच्या संघासह,सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन,सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन,चंद्रोस क्रिकेट क्लब पुणे,बास क्रिकेट क्लब पुणे,ज्यूडिशियल क्रिकेट अकॅडमी पुणे संघांचा समावेश असणार आहे. स्पर्धेच्या पहिला दोन सामन्यांसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. निवड झालेल्या संघाला आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
रायगडचा मुलींचा संघ-
स्वरा खेडेकर कर्णधार, गार्गी साळुंके, भ्रताती राय, काव्या धावडे, स्वरा बामुगडे, तनश्री सावंत, वेदिका तेटगुडे, संस्कृती पालकर, कनक यादव, दिव्यांका धनावडे, प्रचिती जाधव, किमया कदम, समिधा तांडेल,स्वरा भगत, निशिता विठ्ठलानी, राखीव खेळाडू- तनिष्का वार्गे, रशिता डे, आरुषी जाधव, अनिषा वर्मा, मधुरा बाबर, श्रुती अग्री, वेदश्री शेळके, शुभांगिनी दास







