| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माणिवली सारख्या आडवाटेला असलेल्या गावाला हिराजी पाटील यांच्या हौतात्म्यामुळे जगाच्या पाठीवर जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे पिकते तेथे विकले जात नाही आणि त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायला हवे असे सांगून उपस्थितीबद्दल राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली.
मानिवली येथील हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मारक येथे झालेल्या हुतात्मा हिराजी पाटील स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्जत पंचायत समिती शिक्षण विभाग आणि हुतात्मा स्मारक समिती माणिवली आणि ग्रामपंचायत माणिवली यांच्या माध्यमातून स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीला मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते हुतात्मा हिराजी पाटील यांचे अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी कर्जतचे आ. महेंद्र थोरवे, तालुक्याचे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ, तालुक्याचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गटशिक्षण अधिकारी अनंत खैरे,सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे, हुतात्म्यांचे वारस विठ्ठल पाटील, तसेच तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद पाटील, अमर मिसाळ, राहुल विशे, आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, उपाध्यक्ष शिवाजी कराळे, हिशोब तपासनीस सूर्यकांत चंचे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी पोशीर येथील श्रमजीवी विद्यालय यांच्या एनसीसी पथकाने संचालन केले. या कार्यक्रमात हुतात्म्यांचे वारस जयराम गवळी, रमेश गवळी, अनसूया जामघरे, लीलाबाई तरे, अविनाश भगत, केतकी म्हसकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माणिवली हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष प्रवीण डायरे, उपाध्यक्ष जितेंद्र गवळी, सचिव लहू डायरे तसेच ग्रामपंचायत प्रशासक संजय चव्हाण,ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग म्हसे यांच्याकडून पूजा डायरे आणि पाटील या मुलींनी भाषणे केली.
कर्जत पंचायत समितीने 21 केंद्रामधून मशाल या ठिकाणी आणणत्या आल्या. त्यामध्ये नेरळ, दहिवली, माले, वैजनाथ, खांडपे, वाकस, कशेळे, चिंचवली, भिसेगाव, पाथरज, जांभिवली, कर्जत, वारे, कळंब, जामरूख, खांडस, नांदगाव, भोईरवाडी, शेलू, कडाव, बेकरे, दहिवली वरेडी आदी केंद्रांचा समावेश होता. कर्जत तालुक्यात असलेल्या 240 प्राथमिक शाळांमध्ये गेली 20 वर्षांपासून हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी प्रभात फेरी सर्व शाळांमध्ये काढल्या जातात.







